ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

एस टी कामगारांना संप काळातील वेतन देण्यास सरकारचा नकार

मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पाच महिने संप करणाऱ्या एस टी कामगारांना संपाच्या काळातील वेतन देण्यास सरकारने नकार दिला आहे.
पाच महिन्याच्या संपामुळे एस टी चे प्रंचड आर्थिक नुकसान झाले आहे आणि ही बाब यापूर्वीच सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे .त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईड लाईन नुसार काम नाही तर वेतन नाही हीच भूमिका एस टी महामंडळाने घेतली आहे .त्यामुळे आता कामावर हजर राहून महिना भरल्याशिवाय एस टी कामगारांना फुटकी कवडीही मिळणार नाही .त्यातच ज्याच्या चीठवणिमुळे संप चालू ठेवला तो सदावर्ते आत आहे आणि त्याच्यावर रोज कुठल्या कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतोय त्यामुळे 6 महिने तरी तो बाहेर येईल वाटत नाही शिवाय पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 109 एस टी कामगारांच्या आता नोकऱ्या गेल्यात जमा आहे त्यामुळे संपकरी एस टी कामगारांवर आता पश्चातप करण्याची पाळी आलीय .

error: Content is protected !!