ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

इलेक्ट्रॉनिक मीडियाला आवरा

सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .

error: Content is protected !!