ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

खारघर दुर्घटनेतील मृतांची संख्या १३
सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर


मुंबई – निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ऊषामाघटने १३ जणांचा मृत्यू झाला या प्रकरणी सरकारने मयताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर झाली आहे .
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला होता. त्यावेळी उष्माघाताने 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याने पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. त्यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक आहे. या घटनेवर कोणीही राजकारण करू नये असे
श्री सेवकांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेबांनी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.

आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले.

झालेला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले.

error: Content is protected !!