ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दहवीच्या निकालात पुन्हा मुलींनीच मारली बाजी


मुंबई/बारावीच्या निकालाच्या पाठोपाठ काल दहावीचा निकाल लागला आहे .यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के इतका लागला असून यंदाही कोकण विभागाने आणि मुलींनी बाजी मारली आहे
15 मार्च ते10 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली होती पण मधल्या काळात शिक्षकांच्या आंदोलनामुळे निकाल वेळेवर लागेल की नाही याबाबत शंका होती पण नंतर बारावीच्या निकाल नंतर दहावीचा निकाल जूनच्या 30 तारखेला लागेल असे सांगितले जात होते पण नंतर हा निकाल 17 जून रोजी जाहीर होईल असे सांगण्यात आले त्यानुसार काल दहावीचा निकाल जाहीर झालं यात 97.96 टक्के मुली तर 95.06 टक्के मुले उत्तीर्ण झाली यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून कोकणचा निकाल 99.27 टक्के लागला आहे तर नाशिकचा निकाल सर्वाधिक कमी म्हणजेच 95.90 टक्के इतका आहे
विभागवार निकाल
कोकण/ 99.27
कोल्हापूर/ 98.50
लातूर / 97.27
नागपूर/ 97.00
मुंबई/ 96.94
अमरावती/ 96.81
औरंगाबाद/ 96.33
पुणे. / 96.96
नाशिक/ 95.90

error: Content is protected !!