ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अग्निपथ कधी विझनार


भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत आहे. त्यामुळे राजला जसे कोणाला अडवयची हिम्मत नव्हती तशाच प्रकारे आता पंतप्रधान महाराजांना अडवायची कोणाची हिम्मत नाही म्हणूनच तर ना खाता ना वही मोदी कहे वोह ही सही असा देशाचा कारभार सुरू आहे.आणि जबरदस्तीने लादलेली नोट बंदी,शेतकरी कायदे,जी एस टी ही त्याचीच उदाहरणे आहेत आणि आता अग्निपथ नावाची अशीच एक योजना लादण्याचा केंद्राने घाट घातला आहे. मात्र ही योजना तरुणाच्या भवितव्याशी खेळणारी असल्याने या योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरलेत त्यांनी जाळपोळ सुरू केली आहे आता केंद्राचे गुलाम असलेले इलेक्ट्रॉनिक मीडियावाले या आंदोलन कर्त्याना दहशतवादी किंवा पाकिस्तानचे हस्तक ठरवतील जसे शेतकरी आंदोलकांना खलिस्तानी ठरवले .तसेच अग्निपथ च्या विरोधकांना पाकिस्तानी ठरवले जाईल पण लोकांचा आवाज किती दबणार ? कधीना कधी तुम्हाला सतेतून जावेच लागेल..

error: Content is protected !!