ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पालिका मुख्यालयात एसआयटी कडून कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु


घोटाळ्यातील पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
मुंबई -मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणात एसआयटी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे. जवळपास एक ते दीड तास या पथकाने विविध विभागातील कारभाराची माहिती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एसआयटी पथकाने सुधार विभागातील सहआयुक्तांकडे मुंबई महापालिकेतील कारभारा संदर्भात चौकशी केली. कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कारभारा संदर्भात कॅगचा अहवाल अर्थसंकल्पी अधिवेशनात सादर करण्यात आला होता. या कॅग अहवालात मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कारभारामध्ये अनियमितता आढळल्याचा समोर आलं होतं.
हा अहवाल समोर आल्यानंतर भाजपकडून या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी जोर धरु लागली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य केली. जून महिन्यात या सगळ्या कारभाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानंतर मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता (नियोजन) सुनील राठोड यांच्या दालनात हे एसआयटीचे पथक दाखल झाले होते. त्या ठिकाणीसुद्धा या पथकाने या विभागातील कारभारासंदर्भात चौकशी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी आर्थिक गुन्हे शाखेने कॅगच्या अहवालासंदर्भात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले होते. या अधिकाऱ्यांकडून आर्थिक गुन्हे शाखेने अधिकची माहिती मिळवली असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या चौकशीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्राम सिंग निशाणदार यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला होता. त्याचप्रामाणे हा एसआयटी चौकशीचा भाग असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. तसेच विविध विभागांची ही चौकशी सुरु राहणार असून कॅगच्या अहवालानुसार ही चौकशी केली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.
बीएमसीच्या जंबो कोविड-१९ केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असं ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. . बीएमसीच्या जंबो कोविड-१९ केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीनं केला आहे.
एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे आता एसआयटी देखील अॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

error: Content is protected !!