मुंबई बुडणार ?–भारतातील १२शहरे समुद्र गिळणार;नासाचे धक्कादायक भाकीत –
मुंबई/ ग्लोबल वॉर्मिग मुले निसर्गात होत असलेले बदल आता समुद्र किनाऱ्यावरील शहरांसाठी काळ ठरणार आहेत कारण नासाने केलेल्या पाहणीत पुढील दोन दशकात मुंबई सह भारतातील १२शहरे अरबी समुद्रात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे
नासाने आपल्या संशोधनातून एक सी टुल तयार केले आहे यात अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी ०११ते०.१४ इतकी वाढलेली असल्याने भराच्या समद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांना मोठा धोका निर्माण झाला आहे .अगोदरच मुंबई सारख्या शहरात अतिवृष्टी मुळे पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही त्यामुळे मुंबई मध्ये पाणी तुंबते केवळ मुंबई मध्येच नव्हे तर चेन्नई,विशाखापट्टणम,भावनगर ,कांडला या समुद्र किनाऱ्यावरील शहरांची सुधा हीच स्थिती आहे .त्यातच पावसाचे प्रमाण समुद्र परिसरात अधिक असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे .पुढील दोन दशकात ती आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि समुद्राचे हे पाणी शहरांमध्ये घुसून भारतातील १२ शहरा मध्ये जलप्रलय येऊन ही शहरे बुडतील अशी भीती नासाने व्यक्त केली आहे. त्यामुळे ही शहरे वाचवण्यासाठी सरकारने आणि इथल्या शास्त्रज्ञांनी आता पासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे .ज्या शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे त्यात मुंबई,चेन्नई आणि विशाखापट्टणम या सारख्या महानगरांच्या समावेश असून तिथली लोकसंख्या एक कोटींच्या वर आहे त्यामुळे या शहरांमध्ये जर का जलप्रलय झाला तर किती भयंकर परिस्थिती निर्माण होईल याची कल्पनाही करता येणार नाही
बॉक्स/ समुद्रात बुडण्याची धोका असलेली १२शहरे मुंबई (महाराष्ट्र),ओखा ,खंडाळा, भावनगर(गुजरात), मोर्मुगव(गोवा), चेन्नई,तुटिकोरीन(तामिळनाडू), विशाखापट्टणम(आंध्र), कोची(केरळ), परदीप(ओरिसा), किद्रोपर (प.बंगाल)