ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका –पिंपरी चिंचवड महापालिकेवर ए सी बी चा छापा- खळबळजनक


पुणे/ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा बढाया मारणाऱ्या भाजपचा काल पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्दाफाश झाला आहे .भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत चक्क स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या स्विय सहायकला दोन लाखांची लाच घेताना अटक झाली. या घटनेमुळे श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची आणि सत्ताधारी भाजपची मोठी नाच्चकी झाली आहे.
काल पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी थेट सर्वसाधारण सभेत घुसले .त्यांनी स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले तत्पूर्वी नितीन लांडगे यांच्या स्वीय सहाय्यक एका कंत्राटदाराकडून पालिकेत दोन लाखांची लाच घेताना ए सी बी क्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते.या घटनेमुळे पालिकेत मोठी खळबळ माजली दरम्यान ए सी बी च्या अधिकाऱ्यांनी नितीन लांडगे यांची आणि काही पालिका अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली असता एका कंत्राटदाराकडून ९ लाखांची लाच मागण्यात आली होती .मात्र २ लाखांवर तडजोड झाली पण त्या कंत्राटदाराने या प्रकरणी ए सी बी कडे तक्रार करताच ए सी बी ने आपला लाऊन आरोपींना अटक केली.


बॉक्स/स्थायी समितीत चोर चोर मौसेरे भाई
स्थायी समितीत कंत्राटे मंजूर करण्यासाठी कंत्राटदारांकडून लाच घेतली जाते आणि यामध्ये स्थायी समिती मधील सर्व पक्षाचे नगरसेवक भागीदार असतात पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे .मात्र स्थायी समितीत भाजप सह काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सुधा सदस्य आहेत. त्यामुळे हे सगळे चोर चोर माऊसेरे भाई असल्याने या सगळ्यांवर कारवाई करा अशी मागणी पिंपरी चिंचवड च्या जनतेने केली आहे.

error: Content is protected !!