पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
मुंबई/ विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार याची प्रचीती काल पहिल्याच दिवशी आली कारण विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणाबाजी केली ई डी सरकार हाय हाय पण खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यान आज पहिल्या दिवशी फारसे कामकाज झाले नाही .मात्र कालचा अध्याय आज पुढे सुरू राहणार येवढे मात्र नक्की!
आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणा बाजी करीत होते.शिंदे गटाचे आमदार यायला सुरुवात होताच आलेरे आले गद्दार आले 50 खोके एकदम ok अस घोषणा दिल्या जाऊ लागल्या त्यावर शंभूराजे देसाई म्हणाले की तुम्हाला हवेत का ? दरम्यान सभागृहात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते यांची भाषणे झाली दरम्यान शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी सुरूच होती विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळला तसेच पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या दरम्यान काही ठरवांचे नंबर मागेपुढे झाल्याने भास्कर जाधव चांगलेच संतापले होते . त्यांना अजित दादांनी समजावले तसेच संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे यांच्या अरेरावी वरूनही विरोधक आक्रमक झाले होते पहिला दिवस अशतेहेने वादळी ठरला .
बॉक्स
मेटेंच्या अपघाताची सी आय डी चौकशी करणार
शिवसंग्राम पक्षाचे नेते दिवंगत विनायक नेते यांच्या अपघाताची सी आय डी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेटे यांच्या करला 14 तारखेला पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एका टूकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मेटे यांचे निधन झाले होते . मात्र त्याच्या ड्रायव्हर वर संशय व्यक्त करण्यात येत आहे