सरकार आणि पक्षातही डावललं नाराजी वाढली शिंदे गट फुटणार?
मुंबई/ शिवसेनेत बंडखोरी करून ज्या 40 आमदारांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले होते मात्र त्यातील काहींना सरकार आणि पक्ष संघटनेत सुधा कोणतेही पद मिळालेले नाही त्यामुळे ते नाराज झाले असून त्यातील काही फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करून महा विकास आघाडीचे सरकार पाडले आणि त्यानंतर भाजप बरोबर सोयरिक करून नावे सरकार बनवले मात्र शिवसेनेत बंडखोरी करताना ज्या आमदारांना सतेचे गाजर दाखवण्यात आले होते त्यातील काहींना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही अशा पलिकडची आहेत संजय शिरसाट आणि शहाजी बापू पाटील तसेच आणखी काही आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही शिंद सोबत दोन महिला आमदारांनी सुधा बंडखोरी करून शिंदे सोबत आल्या पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही त्यानंतर शिंदेंनी आपल्या गटाचे काही प्रवकते आणि नेते नेमले त्यातही काहीना स्थान मिळाले नाही . त्यामुळे संजय शिरसाट ,शहाजी बापू पाटील आणि इतर काही आमदार नाराज असून आपण उगाच शिवसेना सोडली अशी पश्चात्यापाची भावना त्यांच्यात आहे म्हणून ते आता शिंदेंची साथ सोडण्याचा विचार करीत आहेत अशी सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे .