ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

तब्बल वीस तासानी गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत लालबागचा राजाचे विसर्जन


मुंबई/कोट्यावधी गणेश भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले लालबागच्या राजाचे बुधवारी सकाळी नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत विसर्जन करण्यात आले .तब्बल वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी सकाळी श्रींच्या मंडपातून निघालेली लालबागचा राजाची भव्य मूर्ती प्रचंड मोठ्या मिरवणुकीतून लालबाग ,भारत माता, चिंच पोकळी, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेरोड, नागपाडा आदी मार्गाने आज सकाळी गिरगाव चौपाटीवर आली. त्यानंतर पन्नास यांत्रिक बोटी आणि त्यात शेकडो गणेश भक्त आदींनी मिळून भल्या मोठ्या तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती ठेवून ,खोल समुद्रात हायड्रोक्लोरिक क्रेनच्या सहाय्याने लालबागचा राजाचे विसर्जन विसर्जन केले. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! या घोषनानी संपूर्ण गिरगाव चौपाटी दणाणून गेली होती. गणेश चतुर्थी पासून गेले अकरा दिवस लालबागच्या राजाच्या दरबारात रोज लाखो भाविकांची गर्दी होत होती. यामध्ये अमित शहा सारख्या बड्या नेत्यांपासून, ते चित्रपट कलाकारांपर्यंत सर्वांचा समावेश होता. सर्वांनी भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. लांबच लांब रांगांमधून आबा विरुद्ध आणि लालबागच्या राजाचे दर्शन घेतले यावेळी लालबाग मध्ये महानगरपालिका, तसेच तसेच काळाचौकी पोलिसांनी बंदोबस्ताची कामगिरी चोखपणे पार पाडली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव शांततेने पार पडला.

error: Content is protected !!