ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

ग्रँट रोड मध्ये पालिका शाळेचा झाला स्टुडिओ- शूटिंगमुळे शाळा दुरुस्ती कंत्राट काम थांबविले जाते–खळबळजनक-

मुंबई (किसनराव जाधव) पट संख्या कमी असल्याचे कारण सांगून मुंबईतील महापालिकेच्या अनेक शाळा बंद पाडण्यात आल्या आणि शाळांच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्या असा आरोप नेहमीच मुंबईकर करीत आहेत आणि यामागे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर लोबीचा हात असल्याचा आरोप मुंबईकर जनता करतेय मात्र ग्रँट रोड येथे पालिका शाळा विभागाच्या इमारतीचा चक्क स्टुडिओ झाला असून तिथे चित्रपटांची शूटिंग होते. भलेही पालिकेला त्याचे भाडे मिळत असेल तरी या ठिकाणी होणार्‍या चित्रीकरण मुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा होते. मात्र शूटिंग करणारे ते उचलत नसल्याने परिसरातील लोकांमध्ये संताप आहे
ग्रँट रोड वर गिल्बर्ट लेन मधील पालिका इमारतीत शाळेचा काही भाग व बँकेला देण्यात आली त्यानंतर ही शाळा पालिकेचे सामान ठेवण्यासाठी स्टोअर स्वरूपात वापरण्यात येत आहे आणि आता या ठिकाणी चित्रपटांचे शूटिंग चालू असते आता इमारतीची जागा सिनेमाच्या शूटिंग साठी दिली जात आहे कदाचित ही जागा विकण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकार्‍यांना तगडा गिर्‍हाईक मिळाला नसावा पण आज ना उद्या ही जागा कुठल्यातरी बिल्डरच्या घशात जाणार येवढे मात्र नक्की! असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे
शूटिंगचे गौंडबगाल
डी प्रभागाचे शाळा प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून शूटिंगचा परवाना दिला जातो.या परवाना मध्ये दोन ते तीन दिवसात शूटिंग प्रत्यक्ष पार पडते पण त्यापूर्वी एक दिवस अगोदर शूटिंग सामान सेटिंग करण्यासाठी आणि शूटिंग झाल्यावर एक दिवस सेट काढण्यासाठी वेळ जातो .परंतु प्रत्यक्ष दोनच दिवसाचे भाडे घेऊन इतर दोन दिवस शूटिंग वाल्या साठी मोफत देवून कोणाचे भले करण्याचा डाव खेळ ला जातो ? याकडे शाळा प्रशासकीय अधिकारी , सहायक आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष देत नसल्याने पालिकेचा केअर टेकर याचा मनमानी कारभार चालवल्याचे कळते. या बेंबदशाही रोखणार कोण?

एकदा भेट देवून चौकशी करा. –शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती संध्या जोशी,प्रमुख समिती अध्यक्ष डी वार्ड श्रीमती मीनल पटेल, अतिरिक्त आयुक्त शहर- श्रीमती अश्‍विनी भिडे,उपायुक्त शिक्षण अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी परिमंडळ 1- श्रीमती संजीवनी कापसे,अधीक्षक शाळा परिमंडळ 1-निसार खान आणि डी प्रभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड अशी जबाबदार मंडळी करतात काय? एकदा भेट देवून चौकशी करा.

शूटिंगमुळे शाळा दुरुस्ती कंत्राट कामाचे वाजले तिनतेरा
सदर शाळा इमारत दुरुस्ती साठी पालिका शाळा पायाभुत विभागाने कंत्राट काढले. आर.जी.शहा नावाचा कंत्राटाला काम लागले आहे. त्यामध्ये प्लॅटर ,लादीकरण, नवीन दरवाजे लावणे आदी कामे अंतर्भूत आहे .परंतु शूटिंगमुळे या कामांना ब्रेक लागत असल्याने वेळ वाया जात असल्याने कंत्राटदार ही कामे थातुरमातूर करून बिले दिले घेण्याची शक्यता दिसते. या संबंधित शाळा प्रशासकीय अधिकारी रोहीणी लाळगे यांनी या शूटिंग आवर घालून कंत्राटदाराला वाव देऊन इमारतीचे मजबुतीकरण करणे गतजेचे आहे. कारण यावर जनतेचा लाखो पैसा खर्व होत असल्याने त्याची वाताहत होत आहे .

error: Content is protected !!