ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

आंबवकर सेवासंघ (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) या संघटनेची पहिली कार्यकारणीची सभा मुंबई येथे संपन्न.

आंबवकर सेवा संघ (नोंदणीकृत) मुंबई – रत्नागिरी यांची पहिली कार्यकारणी सभा विक्रोळी येथे पार पडली. सदर संघटनेचे कार्यक्षेत्र हे मुबंई व रत्नागिरी येथे आहे.
आंबवकर सेवासंघ या संघटनेचे महत्वाचे उद्देश्य हे मूळ वतन आंबव या गावातून विखूरलेल्या समस्त आंबवकर भावकीस (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) यांस एकत्र आणणे व त्यांची सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक प्रगति करणे हे आहे. सर्व भावकी समाजामधे सामाजिक प्रबोधन घडवून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, युवा पीढीला शिक्षणा चे महत्व समजावून व उच शिक्षण करिता प्रोत्साहन देणे, स्थलांतरीत गावांमध्ये भावबंदास जर कोणत्या सामाजिक अथवा अन्यायकारक समस्या उद्भवल्यास त्यांच्या निवारणासाठी प्रयत्न करणे इ. सेवाभावी कामे ही आंबवकर सेवासंघाच्यावतीने केली जातील.
आपण सर्वं भावकी हे तत्कालिन चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेच्या जाचामुळे तसेच नोकरी- धंद्यामुळे इतरस्त्र १९-२० गावांमध्ये स्थलांतरीत झालो असलो तरी मूळ गाव आंबव, येथे आपले ग्राम देवता, कुलदेवता व मुळपुरुष असल्यामुळे तिथे समाज मंदिर बांधण्याचा मानस कार्यकारणी ने व्यक्त केला. आंबवकर सेवासंघाचे अध्यक्ष सुभाष आंबोकर व सरचिटणीस संदीप आंबवकर ह्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच लवकरच समस्त आंबवकर भावकीचा जाहिर महामेळावा आयोजित करण्याचे कार्यकारीणीने यावेळी सांगितले.
आंबवकर सेवासंघांचे उपाध्यक्ष शशिकांत आंबेकर हे ह्या महिन्यात समीर आय आय टी , पवई, मुंबई, ह्या सरकारी नोकरीतुन सेवानिवृत्त होत असल्याने व वयाची 60 वर्ष पूर्ण करीत सल्याने संघातर्फे त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. संघाचे कोषाध्यक्ष नितीन आंबवकर. गणेश आंबोकर. मनोहर आंब्रे (आंबोकर ), श्गौरव आंबोकर व . घनश्याम आंबोकर इ.नी उपस्थित दर्शवत राहून आंबवकर सेवासंघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…… ब रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आंबवकर समाज मंदिर बांधण्यात येणार आहे व पहिला भव्य मेळावा मुंबईत होणार आहे……

error: Content is protected !!