मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात-आशिष शेलार
मुंबई- “विद्यापीठाच्या निविदांमधील निधी वळवण्याचे काम याआधी ठाकरे सरकारने केले आहे. आता यापुढे एक पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात झाली आहे. असे आरोप शेलार यांनी केले. विद्यापीठांच्या निधीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली.
पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी
निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आयोजीत केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाल्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनीही गंभीर आरोप केले आहेत. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.