ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईविश्लेषण

आता मुलींचे शोषण थांबेल!

केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे बाल विवाह कायद्यात सुधारणा करून मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१वर्ष करण्याचा! भारतीय संस्कृती आणि जुनाट रूढी परंपरा मध्ये स्त्रीवर अन्यायच झालाय. तिला चूल आणि मुल यात अडकवून ठेवण्यात आले होते.आणि सगळ्यात जर भयंकर काय असेल तर एखाद्या आठ नऊ वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा बालविवाह तोही कुठल्या तरी वयस्कर माणसाबरोबर लावला जायचा त्यामुळे त्या बालिकेच्या आयुष्याची होळी व्हायची ज्याच्याशी त्याचे लग्न व्हायचे तो तिला कोवळ्या वयात कुस्करून टाकायचा.तिचे लैंगीक शोषण सुरू असतानाच पुढे दोनतीन वर्षात तिला मासिक धर्म सुरू झाला की तिच्यावर अकाली मातृत्व लादले जायचे.लहान वयात गर्भधारणा झाल्यास गर्भाशय कमजोर होऊन स्त्रीला पुढे वेग वेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागायचे .आणि लग्नाची टी बायको लहान वयातच शारीरिक दृष्ट्या कमजोर झाली की मग पुरुष पुन्हा कुठल्या तरी कोवळ्या मुलीला लग्न करून घरात आणायला मोकळा असे सगळे दुष्टचक्र सुरू होते.वास्तविक लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे लग्नासाठी स्त्री असो की पुरुष त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमताही विचारात घेणे गरजेचे असते .खास करून स्त्रीच्या बाबतीत याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण गर्भधारणेसाठी तिची शारीरिक क्षमता असणे गरजेचे असते कारण बाळंतपण आणि प्रसूती नंतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो असे म्हणतात ते काही खोटे नाही .कारण नऊ महिन्याचा तो काळ स्त्रीसाठी एकप्रकारचे अग्निदिव्य असते.म्हणूनच लग्नाचे वय किमान २० वर्ष तरी असावे अशी मागणी केली जात होती ती अखेर सरकारने मान्य केली असून मुलीचे लग्नाचे वय यापुढे २१वर्ष इतके असावे असा सरकार कायदा करणार आहे. त्यासाठीचे एक विधेयक तयार करण्यात आले असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे आता याच अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले जाईल. हे विधेयक जेंव्हा संसदेत मंजुरीसाठी येईल तेंव्हा विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये.तर सामाजिक जबाबदारी समजून ते मंजूर करण्यास मदत करावी.आपल्याकडे सध्या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क आहे महिलांचा विकास आणि सुरक्षेसाठी बेटी बचाव बेटी pdhao यासारखे महत्वकांक्षी अभियान चालवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मुलीचे लग्नाचे वय २१करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

error: Content is protected !!