ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

भायखळा येथील ग्लोरिया कन्या शाळेच्या मैदानावरील वखारीला लागलेली आग व अनधिकृत बांधकामाचा मुद्दा विरोधी पक्षनेते दरेकर विधान परिषदेत उचलणार


पालिका आणि जिल्हाधिकारी अधिकार्‍याचे धाबे दणाणले…

मुुंबई/ भायखळा येथील ग्लोरिया शाळेच्या मैदानात बेकायदेशीर वखारी उभारून आता त्या जागेवर न्यायालयात दावा करणारी वाखरवल्याना पालिका पाठीशी घालीत असल्याचे पाहून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पालिका अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि हा मुद्दा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं इशारा दिलाय त्यामुळे या बेकायदेशीर वाखरिना पैसे खाऊन अभय देणार्‍या पालिका अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
काही दिवसांपूर्वीच ग्लोरिया कन्या शाळेच्या भूखंडावर असलेल्या अकरा वखरीला मोठी आग लागली होती सुदैवाने करोना काळात शाळा बंद असल्याने मोठी जीवित हनी टळली .त्यामुळे या गंभीर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर मंगळवारी (दिंनाक-18 जानेवारी) आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी पोचले यावेळी त्यांच्या सोबत पालिकेच्या ई विभागाचे कार्यकारी अभिंयता चव्हाण आणि भायखळा पोलिस ठाणे अधिकारी सुधा हजर होते. शाळेच्या भूखंडावर हे बेकायदेशीर उद्योग कसे उभे राहिले पालिकेने त्यावर कारवाई का नाही केली? अशा शब्दात दरेकर यांनी पालिका अधिकार्‍यांवर भडीमार केला. तेंव्हा हे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगितले.

मात्र आग लागल्यानंतर पुन्हा जे त्यांनी बांधकाम केले त्याला आम्ही एम आर टी पी ची नोटीस दिली आहे असा खुलासा पालिका कारखाना अधिकार्‍यांनी केला. मात्र त्याने दरेकर यांचे समाधान झाले नाही आणि हा प्रश्‍न आपण अधिवेशनात उपस्थित करणार असे सांगितले आहे त्यामुळे या बेकायदेशीर वाखरिना अभय देणार्‍या पालिका अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
भायखळा पश्‍चिम येथील हा भूखंड पूर्वी जिल्हाधिकार्‍यांकडे होता ग्लोरिया शिक्षण संस्थेने तो 5 कोटीचा विकत घेऊन तिथे शाळा बांधली अशी माहीती शाळा प्रमुखानी दिली. दरम्यानच्या काळात तिथे एका धंद्याचे अनेक बेकायदा गाळे उभे राहिले आणि आता ते तिथून हटायला तयार नाहीत यातील काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने आणि ही कन्या शाळा असल्याने तिथे शिकणार्‍या मुलींच्या आणि शाळा प्रशासन मधील लोकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असल्याची माहीती पालक आणि शाळा प्रमुखांनी दरेकरांना दिली. या प्रकरणात दबाव असल्याचे सांगून मोकळे झालेल्या पालिका अधिकारी मात्र आता न्यायालयाकडे बोट दाखवून यातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत .पण ज्या दिवशी हे प्रकरण विधान परिषदेत चर्चेला येईल तेंव्हा सरकारला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावीच लागेल कारण हा एका कन्या शाळेचा संवेदनशील मुद्दा आहे असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पतकारांना सांगितले.
भायखळा भाजप पदाधिकार्‍यानी मुद्दा ऐरणीवर आणला-
या प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी भायखळा भाजपचे विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर, ओबीसी सेलचे सचिव रोहिदास लोखंडे, माजी म्हाडा अध्यश्र मधू चव्हाण, युवा अध्यक्ष प्रथमेश कानडे आदी पदाधिकार्‍यांनी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर याना जागेवर बोलावून मुद्दा ऐरणीवर आणला.

error: Content is protected !!