ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विरोधी नेत्यांवर इडीची उडी- मुश्किले बडी – किशोरी पेडणेकर , रोहित पवारांना इडीची नोटीस

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान किशोरी पेडणेकर यांना २५ जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शुक्रवार १९ जानेवारी रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांना देखील समन्स बजावण्यात आलंय. मागील अनेक दिवसांपासून याचसंदर्भात किशोरी पेडणेकर यांची चौकशी देखील सुरु होती. त्यामुळे आता यावर किशोरी पेडणेकर या काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून १२०० बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी १६ मे ते ७ जून २०२० या कालावधीत प्रत्येकी ६ हजार ७१९ रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल २०२० मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.
वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतचं त्यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आलीये.

error: Content is protected !!