ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर

मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजते
आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत प्रामुख्याने आघाडीतील आमदारांना समान विकास निधी वाटप करण्याबाबत आग्रह धरण्यावर चर्चा झाली. आणि त्यानंतर साडेपाच वाजता कॉंग्रेसचे शिष्टमंडळ वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले. या शिष्टमंडळात नाना पटोले , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ,यशोमती ठाकूर , अस्लम शेख ,नितीन राऊत ,एच के पाटील,भाई जगताप आदी कॉंग्रेस नेते होते . यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काही मुद्द्यांबाबत कॉंग्रेस मध्ये असलेली नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आली .तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड ,समान विकास निधी वाटप, निर्णय प्रक्रियेत कॉंग्रेसला सामील करून घेतले जात नसल्याची तक्रार आदी काही महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. त्याच बरोबर ओबीसी आरक्षण आणि सध्या भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेले गंभीर आरोप आणि त्यातून असेकारची होत असलेली बदनामी आदी विषय सुधा या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कॉंग्रेसची नाराजी दूर करण्यात आल्याचे समजते.

error: Content is protected !!