ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदाबाद बॉम्ब स्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा


अहमदाबाद/ जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील 49 दोषींना काल न्यायालयाने शिक्षा सुनावली यामधे 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जनमठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे
26 जुलै २००८ मध्ये अहमदाबाद शहरात २० साखळी बाँबस्फोट झाले होते यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जन जखमी झाले होते विशेष म्हणजे सुरत मध्ये सुधा साखळी बॉम्ब स्फोट केले जाणार होते पण टायमर मध्ये बिघाड झाल्याने 29 बॉम्ब फुटला नाहीत अन्यथा मोठा नरसंहार झाला असता दरम्यान अहमदाबाद पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात 30 जणांची धरपकड केली त्यांच्या चौकशीतून हे साखळी बॉम्ब स्फोट इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने केल्याचे उघड झाले होते त्यानंतर देशाच्या विविध भागातून आणखी48 जणांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर न्यायालयात खटला दखल करण्यात आला गेल्या ८ फेब्रुवारीला या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायलयाने 77 पैकी 49 जणांना दोषी ठरवले तर उर्वरित २८ जणांची सबळ पुरवठा अभावी निर्दोष मुक्तता केली न्यायलयाने त्यावेळी आपला निकाल राखून ठेवला होता आणि काल विशेष सत्र न्यायाधीश ए आर पाटील यांनी निकाल जाहीर केला यात 38 जणांना फाशी तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे दरम्यान या नराधमाना लवकरात लवकर फासावर लटकवा अशी मागणी गुजरातमधील जनता करीत आहे

error: Content is protected !!