मढ मधील बेकायदा बंगल्यावर कारवाई होणार
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालिकेकडे मालाड मढ येथील 41 बेकायदेशीर स्टुडिओ 22 बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी केली होती. मात्र तत्कालीन पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार या बंगल्यांना काही दिवस अभय देण्यात आले होते असा दावा करण्यात आला .बंगले उभारताना पालिका किंवा अन्य सरकारी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता .त्यामुळे पालिकेच्या मालाड पी उत्तर विभागाने बंगल्याच्या मालकांना नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामधील 16 जणांनी कागदपत्रे सादर केली त्याची छाननी महापालिका करत आहे. उर्वरित लोकांनी कागदपत्रे सादर न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची संकेत मिळाले आहे.