महाकुंभ बाबत- ममताच्या विधानामुळे हिंदूंमध्ये संताप
कोलकाता – सुर्याग्रज मधील कुंभ मेळ्यात आतापर्यंत ५२ कोटी भाविकांनी स्नान केले . असे असतानाही या कुंभमेळ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर टीका करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी महाकुंभाला मृत्यूकुंभ म्हटले आहे तसेच या कुंभमेळ्यात सरकारने चांगले नियोजन केले नाही असा आरोप करून योगी सरकारवर टीका केली आहे त्यामुळे हिंदू मध्ये संतापाची लाट उसळली आहे
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य करत ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेत म्हणाल्या की, पश्चिम बंगालच्या विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “हा ‘मृत्युकुंभ’ आहे. मी महाकुंभचा आदर करते, मी पवित्र गंगा मातेचा आदर करते पण तिथे कोणतीही व्यवस्था नाही. श्रीमंत, व्हीआयपींसाठी १ लाख रुपयांपर्यंतच्या तंबूंची तरतूद आहे. मात्र, गरिबांसाठी कुंभमेळ्यात कोणतीही व्यवस्था नाही. मेळ्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती होणे सामान्य आहे, पण हे होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. हे रोखण्यासाठी तुम्ही काय योजना आखल्या?”
पश्चिम बंगालच्या विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “
