ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर शहरात नामांतराच्या समर्थनात भव्य मोर्चा

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी,सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ आयोजन करण्यात आले. इतर अनेक पक्ष आणि संघटनांनी देखील या मोर्च्याला पाठींबा दिला.
          शहरातील क्रांती चौकातून साडेअकरा वाजेच्या सुमारास या मोर्च्याला सुरवात झाली होती.पुढे जालना रोडवरून निराला बाजार मार्गे हा मोर्चा औरंगपुऱ्यातील फुले चौकात जाऊन पोहचला होता.यावेळी फुले चौकात मोठा स्टेज उभारण्यात आला आणि यावरून अनेक नेत्यांची भाषणे देखील झाली.यावेळी मोर्चेकरांच्या हातात असलेल्या भगव्या झेंड्यामुळे निराला बाजार परिसर आणि औरंगपुरा चौक भगवेमय झाले .
या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून, पोलीस आयुक्त निखील गुप्ता स्वताः मोर्च्यास्थळी उपस्थित होते.

error: Content is protected !!