सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत
सलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या धमकीच्या मॅसेज मध्ये आम्ही तुझा मुंबईतच गेम करणार आहोत अशी धमकी देण्यात आली आहे. तसेच राखी सावंत हिलाही सांगण्यात आले आहे कि या प्रकरणात जर तू लुडबुड केलीस तर तुलाही सोडणार नाही . या धमकीच्या मेलची राखीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेण्यात आल्याचे समजते . तसेच पोलिसांचे सायबर पथक आता मेल पाहवणाऱ्याला ट्रेस करीत आहेत . मात्र या धमकीमुळे सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे