ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मुंबईत 337 धोकादायक इमारती

मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत त्यातील 70 मुंबई शहरात 104 पूर्व उपनगरात आणि 163 पश्चिम उपनगरात आहेत आणि नेहमी प्रमाणे या सर्व इमारतींना पालिकेने नोटीस दिलेली आहे पण नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपली का? या धोकादायक इमारतींचा पुनरविकास वर्षणंवर्ष रखडलेला आहे.आज काल बिल्डर लोक ज्या पद्धतीने जागा हडप करीत आहेत ते पाहता लोकांच्या मनात भीती आहे जर आपण पुनर्विकास करण्यासाठी आपली इमारत एखाद्या बिल्डरच्या हवाली केली तर तो आपल्याला पुन्हा घर देईल की नाही याची लोकांच्या मनात खात्री नाही त्यामुळे लोक आपली राहतो जागा सोडायला तयार नाहीत बिल्डिंग पदुला असली तरी त्यातच राहतात त्यामुळे अशा मोडकळीस आलेल्या इमारती मधील रहिवाश्यांना पालिकेने किंवा सरकारने विश्वास द्यायला हवा.त्यांना लेखी स्वरूपात सरकारकडून आश्वासन मिळायला हवे.तरच लोक मोडकळीस आलेल्या इमारती खाली करतील दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यातील बहुतेक खाजगी मालकाच्या आहेत आणि हे मालक काही मोडकळीस आलेल्या इमारतीकडे लक्ष देत नाहीत उलट त्यांचा या इमारतीमधील जुन्या भाडेकरूंना हाकलून इमारतीची जागा कोट्यवधी रुपयांना बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि म्हणूनच लोक इमारती खाली करीत नाहीत परिणामी मुंबईतील मोडकळीस आलेल्या ईमारतीय प्रश्न पावसाळ्यात खूपच गंभीर बनत आहे म्हाडा किंवा एस आर ए या सरकारी गृहनिर्माण संस्थांवर लोकांचा विश्वास नाही कारण एस आर ए योजने अंतर्गत ज्या ज्या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत त्याला त्याला दहा दहा वर्ष झाली तरी ते पूर्ण झालेले नाहीत परिणामी लोक संक्रमण शिबिरातील खुराड्या मध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत .ज्यांनी संक्रमण शिबिरातील खोल्या घेतल्या नाहीत त्यांची बिल्डर भाडी थकवतोय अशी आज परिस्थिती आहे म्हणूनच धोकादायक इमारतींमधील लोक आपली घरे खाली करीत नाहीत परिणामी पावसाळ्यात मोठे अपघात होतात आणि लोकांचा जीव जातो त्यामुळे ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे .

error: Content is protected !!