ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिवंडी तालुक्यातील चिंचोटी माणकोली रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात गाव विकास समितीचा रस्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत लागल्या रांगा..

भिवंडी दि 19 मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थे विरोधात गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी खारबाव , कालवार व कामण या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील सुमारे दहा ते बारा गावातील स्थानिक नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. या रास्ता रोको आंदोलनामुळे खारबाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . वाहनांच्या सुमारे चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. 

     भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी या राज्य महामार्गाची सद्टीह्या प्रचंड दुरावस्था झाली असून सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून अनेकांचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे. 

error: Content is protected !!