उल्हासनगरात शॉक लागुन दोन मजुरांचा दुर्देवी मृत्यु
.
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथिल शांतीनगर जवळ असलेल्या रिजंसी प्लॉझा या व्यापारी संकुलाच्या टेरिस वर झाडे लावत असताना दोन मजुंराना विजेचा जबर शॉक लागल्याने त्या दोघा ही मजुरांचा जागी दुर्देवी मृत्यु झाला आहे . या घटनेची माहीती अग्निशमन दल व पोलिसाना मिळतात त्यानी घटनास्थळी जावुन त्या दोघांचे शव रस्सीच्या सहाय्याने खाली उतरवुन पंचनामा केल्यावर दोन्ही शव शवविच्छेदना करिता मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले आहे .
उल्हासनगर कॅंप ३ येथिल शांतीनगर जवळ रिजंसी प्लॉझा नावाचे व्यापारी संकुल आहे . या संकुलाच्या ए विंग च्या टेरिस वर विवेकसिंग व रामनारायण पंडीत हे दोघे मजुर झाडे लावत होते . परंतु त्या टेरिस वर एक विजेची एक वायर उघडी होती हे या दोघांच्या लक्षात आले नाही . तेव्हा झाडे लावत असताना त्या दोघाना ही शॉक लागला व त्यातच त्यांचा जागीच मृत्यु झाला हा माहीती टेरिस वर काम करणारा गगन जाधव याला समजताच त्याने त्या संकुलाच्या व्यवस्थापकाला ही माहीती दिली. तर त्या व्यवस्थापकाने ताबडतोब मध्यवर्ती पोलिसाना कळवले. दरम्यान पोलिसानी महापालिकेच्या अग्निशन विभागाला माहीती देवुन घटनास्थळी येण्यास सांगितले . तेव्हा अग्निशमन विभागाचे फायर ऑफिसर बाळु नेटके . पंकज पवार . संदिप आसेकर व राजम हे रिजंसी प्लॉझा येथे पोहचल्यावर त्यानी दोघांचे शव रस्सीच्या मदतीने खाली उतरवले . तेव्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यानी दोन्ही शवाचे पंचनामे करुन शव मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले . मात्र त्या व्यापारी संकुल व्यवस्थापनाच्या हलगर्जी पणामुळेच हे दोन बळी गेले आहेत असा आरोप होत आहे .