हरिहरेश्व्रच्या समुद्रात सापडलेल्या शस्त्राच्या बोटीने सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली
राज्यात हायअलर्ट
मुंबई – एन सणासुदीच्या काळातच मुंबई आणि आसपासच्या परिसरात मोठा घातपात घडवण्याचे दहशतवादी संघटनेचे मनसुबे असल्याचे पुन्हा एकदा स्पस्ट झाले असून काल रायगड जिल्ह्यातील हरिहरे श्वर च्या समुद्रात एक बेवारस बोट सापडली या बोटीत ३ एके ४७ रायफल आणि काही काडतुसे आढळली आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे . दरम्यान या बोटीचा दहशतवादाशी संबंध नसावा असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थमिक चौकशी नंतर सांगितले मात्र तरीही आवश्यक त्या खबरदारीच्या उपाय योजना करण्यात आल्या असल्याचे हि त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेली बोट (Raigad Suspected Boat ) ही लेडी हान नावाची असून याची मालकी ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेची आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. बोटीचं इंजिन खराब झालं. बोटीतील प्रवाशांना कोरियन युद्धनौकेने वाचवले आहे. पाणी तुंबल्याने बोट ओढता आली नाही आणि त्यामुळे ती वाहून गेली. हीच ती बोट असल्याचे नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने सांगितले आहे. बोटीवरील स्टिकर व कागदपत्रांवरून थेट कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी ही बोट आमचीच आहे आणि ती ओमानच्या समुद्रात पलटी होऊन वाहून गेल्याची माहिती नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने दिली. केंद्रीय यंत्रणांकडून देखील याबाबत खात्री करण्यात आली आहे. शिवाय बोट जप्त करून तपासण्यात आली असली तरी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निदवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.