गोविंदा आणि गोपाळा जीव सांभाळून खेळा
आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव! कोरोनामुळे मागील दोन वर्ष हा उत्सव साजरा करता आला नव्हता पण या वर्षी कोरोना गेला नसला तरी त्याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे सरकारने सनांवरचे निर्बंध उठवले आहेत परिणामी यंदा सगळे सण धूमधडाक्यात साजरे. केले जाणार आहेत आज दही हंडी साठी तर सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे गललो गल्ली दहीहंड्या लावल्या जाणार आणि आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील शहरांमधे दही हंडी चां उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने भलेही दहीहंडी वर उंचीची मर्यादा लावलेली असली तरी आपल्याकडे सहसा कायदा कोणी जुमानत नाहीत आणि कायदा कोण कशाला जुमान तील कारण ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे असेच लोक 20 ते 26 लाखांच्या उंच हंड्या बांधतात आणि 9 ते 10 ठार लाऊन गोविंदांना या हंड्या फोडायला भाग पाडतात
यावर्षी दोन राजकीय पक्ष आणि सरकारने सुधा गोविंदांना विमा सुरक्षा कवच दिलेले आहे त्यानुसार हंडी फोडताना एखाद्या गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख तर गोविंदा जखमी झाल्यास त्याला 5 लाख मिळतील पण एवढी मदत पुरेशी नाही .दही हांडीचा आजवरचा इतिहास पाहता या पूर्वी अनेक गोविंदांना हंडी फोडताना दुर्घटना घडू काहींचा मृत्यू झाला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे .अशा अपंगत्व आलेल्यांची स्थिती खूप वाईट आहे .20/20 लाखांची हंडी बांधणारे राजकारणी त्यांच्या मदतीला धावले नाहीत तर ज्यांना अपंगत्व आले ते आज त्यांच्या कुटुंबावर पूर्णपणे अवलंबून आहेत .त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे यावर्षी एखादा गोविंदा जखमी झाल्यास त्याला 5 लाख रुपये विम्याची रक्कम मिळेल पण या 5 लाखात त्याने आयुष्य काढायचे का ? त्यापेक्षा जखमी गोविंदांना त्यांच्या शारीरिक क्षमते योग्य नोकरी द्या आजकालची मुले सुशिक्षित आहेत त्यामुळे जरी त्यांना मोठी दुखापत झाली आणि काही काळ त्यांच्यावर घरात बसण्याची पाळी आली तर ते घरातूनही काम करू शकतात कारण बहुतेकांनी कंप्युटर चां कोर्स केलेला असतो किंवा अपंगत्वामुळे घरात बसण्याची पाळी आली तर घरात बसूनही त्यांना हा कोर्स करता येईल फक्त त्यासाठी सरकारने आवश्यक टी मदत करायला हवी पण सरकार ए वढा उदारपणा दाखवील असे वाटत नाही म्हणूनच आज हंडी फोडण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या गोविंदांनी जीव सांभाळून थरावर उभे राहून हंडी fodavi फोडावी कारण 10 थरांची हंडी लावणाऱ्या चमकेश राजकीय पुढाऱ्यांचा खेळ होतो आणि आमच्या गरीब गोविंदाचा मात्र यात जीव जातो .त्याच बरोबर आज ज्या ज्या ठिकाणी मोठ्या हंड्या लावल्या जातील त्या त्या ठिकाणी रस्ते अडवून स्टेज घातले जातात आणि त्यावर मनोरंजनाच्या नावाखाली बाया नचवल्या जातात हा सगळा प्रकार बीभत्स आहे संस्कृतीच्या विपरीत आहे तो थांबायला हवा आणि चांगल्या व सुरक्षित रित्या दहीहंडीचा उत्सव साजरा व्हायला हवा