ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’- या अभियानांत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उत्स्फूर्त सहभाग

शिलाफलकम्, पंच-प्रण, वसुधा-वंदन, वीरांना वंदन, मिट्‌टी यात्रा, घरोघरी तिरंगा उपक्रमांचे यशस्वी आयोजन

देशसेवा करणाऱ्या सैनिकांसह, विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सन्मान

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भारत सरकार आणि देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून या अभियानांतर्गत मुंबईमध्ये शिलाफलकम्, पंच-प्रण, वसुधा-वंदन, वीरांना वंदन, घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे आणि मिट्‌टी यात्रा आदी उपक्रम राबविण्यात आले. मुंबईकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रभिमान, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम व्यक्त केले.
..
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांच्या मार्गदर्शनात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानात शिलाफलकम्, पंच-प्रण, वसुधा-वंदन, वीरांना वंदन, घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे आणि मिट्‌टी यात्रा आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
..
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘माझी माती माझा देश’ अभियानाची सुरुवात ९ ऑगस्ट २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावरून केली. राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानात करण्यात आली. त्यानंतर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मुंबई महानगरात शिलाफलकम्, वीरांना वंदन, पंच-प्रण, ध्वजवंदन, मिटी यात्रा आदी उपक्रम राबविण्यात आले. विभाग स्तरावरही ‘वीरांना वंदन’ करण्यात आले. तसेच माटी यात्रासाठी प्रत्येक प्रभागातून आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून तो कलश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. हा कलश जिल्हाधिकारी यांचेकडून दिनांक २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे होणा-या मुख्य समारोहासाठी रवाना करण्यात येणार आहे.
..
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘डी’ विभागातील ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ येथे शिलाफलकम् उभारण्यात आले आहे. या शिलाफलकावर २६० वीरांची नावे कोरण्यात आली आहेत. तसेच या फलकावर भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी दिलेला ‘व्हिजन २०४७’ संदेश कोरण्यात आला आहे.
..
पंच-प्रण (शपथ) या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सात परिमंडळातील एकूण २४ विभागात शपथ घेण्यात आली. यासह महानगरपालिकेच्या इतर १०६ कार्यालयातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंच-प्रण घेतली. तसेच शाळा-महाविद्यालये, रुणालयांतही शपथ घेण्यात आली. या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी, कामगार, शिक्षक, विद्यार्थी असे मिळून तब्बल पाच लाख नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच ‘पंच-प्रण’ समयी मातीचे १७ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.
..
घरोघरी तिरंगा अभियानात यंदाही मुंबईकरांनी भरभरून सहभाग घेतला. तसेच मिट्‌टी यात्रा उपक्रमातही सातही परिमंडळातील २४ विभागातील माती एकत्रित करून ती एका कलाशात टाकून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
..

‘वसुधा-वंदन’ या उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’, ‘एम पश्चिम’, ’टी’ आणि ‘एफ उत्तर’ विभागात ‘अमृत-वाटीका’ साकारण्यात आली. याशिवाय प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक विभागात वृक्षारोपण करण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘वीरांना वंदन’
👇
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विभाग स्तरावरही ‘वीरांना-वंदन’ हा उपक्रम हाती घेतला. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानापासून सुरू झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत १११ वीरांच्या कुटुंबातील सदस्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, भारतीय सैनिक, पोलीस आदींच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. प्रशासनाने हाती घेतलेल्या उपक्रमाचे या कुटुंबीयांनी देखील कौतुक केले आहे. तसेच या उपक्रमाने वीरांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील गहिवरून आले.
..
‘जी उत्तर’ विभागांतर्गत दादर येथे उपायुक्त (परिमंडळ २) श्री. रमाकांत बिरादार व ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांच्या विशेष उपस्थितीत ‘वीरांना-वंदन’ हा उपक्रम पार पडला. यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातेवाईक श्री. रणजित सावरकर, हुतात्मा लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांचे बंधू श्री. रंजन गुप्ते, हुतात्मा लेफ्टनंट प्रकाश कोटनीस यांच्या भगिनी श्रीमती मीरा पंडित आदी कुटुंबातील सदस्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. शिवाजी सुर्वे, सैन्य दलाचे निवृत्त अधिकारी श्री. अहमद शेख, वायूसेनेचे निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट श्री. सुहास गोडसे, निवृत्त कॅप्टन श्री. प्रफुल्ल तावडे, स्वातंत्र्य सेनानी श्री. बाबू म्हसकर यांचे पुत्र तथा निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक श्री. रमाकांत म्हसकर, पद्मश्री तथा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त क्रिकेट प्रशिक्षक श्री. रमाकांत आचरेकर सर यांच्या कन्या श्रीमती विशाखा दळवी, पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीमती पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नाट्यनिर्माते स्व. मोहन वाघ यांच्या पत्नी श्रीमती पद्मजा वाघ, अर्जून पुरस्कारप्राप्त मल्लखांबपटू हिमानी परब, श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ क्रीडापटू व समर्थ व्यायाम मंदिराचे श्री. उद्य देशपांडे, स्वातंत्र्य सेनानी ॲड. विठ्ठल हरिश्चंद्र देसाई यांचे नातू ॲड गिरीष राऊत आदींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
..
‘एम पश्चिम’ विभागात सहायक आयुक्त श्री. विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनात ‘वीरांना-वंदन’ हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन श्री. भीमसेन गर्ग, निवृत्त कॅप्टन श्री. जॉन रोचा, नौदलाच्या निवृत्त लेफ्टनंट कमांडर श्रीमती शालिनी अग्रवाल, नौदलाचे निवृत्त लेफ्टनंट कमांडर नीलेश देविदास झोपे, नौदलाचे निवृत्त अधिकारी श्री. ब्रीजमोहन दत्ता, निवृत्त हेड कॉन्सटेबल (सीआयएसएफ) श्री. विठ्ठल तायडे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त श्री. संजय मोरे, सेवानिवृत्त आदींचा सन्मान करण्यात आला.
..

‘एम पूर्व’ विभाग कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त श्रीमती अलका ससाणे यांच्या उपस्थितीत ‘वीरांना-वंदन’ कार्यक्रम घेण्यात आला. माजी सैनिक आणि सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षादलात कार्यरत असलेले ‘एम पूर्व’ विभागातील सुरक्षा रक्षक श्री. ब्रह्मदेव तळप यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व खातेप्रमुख अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!