ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

अतिरिक्त आयुक्त वेलरासु पालिकेला चुना लावण्यान्या चर निवीदा रद्द करणार की बढती देणार ?

मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं मुंबईकरणा चुना लावण्याचा खेळ सुरू आहे यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असल्याचे पालिकेचे कंत्राटदारच दबक्या आवाजात सांगतात खड्डे भरण्यासाठी 24 विभाग कार्यालय निहाय कत्रा ट दार नियुक्ती करण्यात येते . त्यासाठी मर्जीतले कंत्राटदार निवडून अगोदर टक्केवारी ठरवली जाते . यंदा प्रत्येक विभागासाठी 2 कोटी रुपये असे 48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे .यंदा रस्त्याच्या कामासाठी 1.20कोटी किमतीच्या 31 निविदा काढण्यात आल्या आहेत या सर्व निविदामद्धे 26ते33 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी कंत्राटदारणी का दाखवली ? हे वेगळे सांगायची गरज नाही अशा पद्धतीने पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालणारे कंत्राटदार आणि पालिका अधिकार्‍यांचे हे रॅकेट उध्वस्त करण्याची वेळ आता आली आहे . विरोधी पक्षात असलेल्या भाजपने त्याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी मुंबईकरणी केली आहे .

error: Content is protected !!