ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबईराजकीय

किरीट सोमय्यंच्या अटकेची तयारी सुरू ; कोल्हापुरात नो एंट्री

मुंबई – महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे माजी खासदारकीरीत सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍याला प्रशासनाने विरोध केला असून तिनं कोल्हापूर जिल्हा बंदीची नोटिस बजावण्यात आली आहे . इतकेच नव्हे तर सरकारने त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे ही माहिती स्वता सोमय्या यांनीच दिली .सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसणं मुश्रीफ यांचा 127 कोटींचा घोटाला बाहेर काढल्यापासून सोमय्यंच्या विरोधात आघाडी सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे . सरकार मधील तिन्ही पक्षांच्या मागण्या नुसार सोमय्या यांच्याकडे भ्र्ष्टाचाराचे कोणतेही पुरावे नसून ते केवळ स्टंट बाजी करीत आहेत . सोमय्या यांनी आतापर्यंत परिवाहनमंत्री अनिल परब सेनेच्या खासदार भावना गवळी आणि आता हसणं मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत . दरम्यान काल सोमय्या यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी पोलिस पोहचताच भाजपा नेत्यांमद्धे खळबळ माजली कारण सोमय्या रविवारीच मुंबईवरून महालक्ष्मी एक्स्प्रेसणे कोल्हापूर निघणार होते . तत्पूर्वी ते गिरगाव चौपाटीवर जाऊन गणेश विसर्जन मोहिमेत सहभागी होणार होते . पण पोलिसांनी त्यांना रोखले मात्र साडेसहाच्या दरम्यान ते गिरगाव चौपाटीकडे रवाना झाले .मात्र त्यांच्या कोल्हापूर प्रशासन विरुद्ध कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी नोटिस बजावलेली असल्याने त्यांच्या अटकेच्या हालचालींना वेग आलाय .

error: Content is protected !!