ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

गणपती बाप्पा सोबत कोरोंनाच्या नियमांचेही विसर्जन ; पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात तूफान गर्दीत बाप्पाणा भावपूर्ण निरोप

: मुंबई – कोरोंनामुळे यंदाही गणेशोत्सव कठोर निर्बंधांच्या दडपणाखाली अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला पण अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाना चौपाट्यांवर निरोप देण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती आणि या गर्दी बप्पांसह कोरोंनाच्या नियमांचेही विसर्जन करण्यात आले .यंदा विसर्जन मिरवणुकीवर बंदी असल्याने मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये साधेपणाने विसर्जन करण्यात आले .घरगुती गणपतीसाठी कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते आणि त्या तलावात गणेश मुरतींचे विसर्जन करण्यासाठी पालिकांचे खास कर्मचारी तैनात होते तरीही विसर्जनासाठी गर्दी झाली होती . मुंबई महापालिकेने मुंबईच्या 24 विभागांसाठी 25 हजार अधिकारी कर्मचारी तैनात केले होते मुंबईच्या सर्व चौपाट्यांवर विसर्जनासाठी लागणार्‍या आवश्यक त्या एव सुविधा ठेवण्यात आल्या होत्या . मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती सकाळी 10 वाजल्यापासूनच विसर्जनासाठी मोजक्याच कार्यकर्त्यांनीशी निघाले होते .मात्र तरीही बाप्पाना निरोप देण्यासाठी त्या त्या विभागातील लोकांनी गर्दी केली होती यात महिला आणि मुलांची संख्या अधिक होती गणेश गल्लीचा ‘राजा लालबागचा ‘राजा चिंचपोकळीचा चिंतामणी तसेच काळाचौकी फेरबंदर परळ डिलाई रोड आदि मुंबईतील काही मोठ्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्यात गणेश भक्तांची गर्दी झाली होती त्यातील काहींनी मास्क सुधा लावले नव्हते बहुतेक मोठ्या गणपतींचे गिरगाव शिवाजी पार्क आणि जुहू चौपाटीवर नियोजित वेळेत विसर्जन झाले मात्र मुंबईच्या सर्व चौपाट्यांवर बाप्पाना निरोप देण्यासाठी अफाट गर्दी लोटली होती . यात काही घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी सहकुटुंब आणि नतेवाईकांसाह आलेल्या गणेशभक्तांचासमावेश होता महापौर किशोरी पेडणेकर यांनी गिरगांव चौपाटीईवर जाऊन विसर्जनाच्या व्यवस्थेची पाहणी केली . पण गणेश भक्तांच्या अफाट गर्दीसामोर त्याही हतबल दिसल्या सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार न घडतं मुंबईतील गणेश विसर्जन व्यवस्थित पार पडले .पुण्यातील कसबा गणपतीसह पाच मनाच्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्यात गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती आणि या गर्दी समोर पोलिस सुधा हतबल दिसत होते . महारार्ष्ट्रातील इतर शहरांमध्ये सुधा हीच परिस्थिति होती लोकांनी बाप्पांसह कोरोंनाच्या नियमांचेही विसर्जन करून टाकले

error: Content is protected !!