ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ताडदेव मध्ये छम छम सुरू

मुंबई दिं-19 सप्टेबर- गेल्या काही वर्षांपासून मुंबई मधील डान्स बार बंद आहेत दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी कायदा करून डान्स बार मधील नाच बंद केले. मात्र स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील ताडदेव ‘ इडियाना रेस्टॉरंट बार ‘ नावाचा बार असून त्यात बेकायदेशीरपणे अश्‍लील डान्स सुरू असतो. त्यामुळे या बार मध्ये तुफान गर्दी असते या गर्दीत काही चोर, दखलेबाज गुंड,बिल्डर यांच्यासारखे लोक मोठ्या प्रमाणात येत असतात अशी माहिती तिथल्या काही ग्राहकांनीच उघड केली आहे. त्यामुळे या बारवर तत्काळ कारवाई करावी आणि त्याचा परवाना रद्द करावा कारण या बारमुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका होऊ शकतो असे इथल्या जनतेचे म्हणणे आहे. हा बार ताडदेव पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतात काय? असा सवाल इथल्या जनतेने केली आहे.

error: Content is protected !!