बॉम्बस्फोटाच्या मालिकेने लेबनोन हादरले !
पेंजर ट्रांजिस्टर मोबाईल बायोमेट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वॉकी टॉकीज मध्ये फॅशन स्पोर्ट 70 ठार तीन हजाराहून अधिक जखमी
बैरुट – इस्त्राईल विरुद्ध हिजबुल्ला यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर येऊन ठेवलेले आहे. तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या इस्त्राईलने आता तंत्रज्ञानाच्या मदतीने गाजा पट्टी लेबनॉन आणि हमसला ला पाठिंबा देणाऱ्या देशांना जबरदस्त हादरा द्यायला सुरुवात केली आहे मंगळवारी लेबनोनची राजधानी बैरुट मध्ये अनेक पेजरमध्ये ब्लास्ट होऊन १६ लोकांचा मृत्यू झाला होता तर पावणे दोन हजार लोक जखमी झाले होते .त्यानंतर बुधवारी वॉकी टॉकी, कार रेडिओ ,बायोमेट्रिक इलेक्ट्रिक उपकरणे, ट्रांजिस्टर यांच्यामध्ये बॉम्बस्फोट होऊन 300 हून अधिक लोक जखमी झाले .तर दहा जणांना आपले प्राण गमवावे लागले या सर्व हल्ल्यांमध्ये एकसूत्रता असून या मागे इस्त्राईलची गुप्तचर संघटना मोसादचा हात असल्याचा आरोप हिजबुल्याने केला आहे. या हल्ल्यानंतर त्यांनी अनेक रॅकेटचा मारा इस्त्राईलवर केला त्याचबरोबर इस्त्राईलला चांगलाच धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे कारण पेजर पाठोपाठ वोकी टोकी मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हिजबुल्लाचे अनेक जवान मारले गेले कारण मोबाईल वरील संदेश पटकन ट्रेस होत असल्याने दहशतवादी वॉकी टोकीवापरायचे परंतु वॉकी टॉकी मध्येच इस्त्राईलने बॉम्बस्फोट घडवले त्यामुळे आता गाजा पट्ट्यात आणि खास करून लेबलॉनमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आदेश सरकारने नागरिकांना दिले आहेत त्याचबरोबर इस्त्राईल हमस यांच्यातील लढाई आता अधिक तीव्र होणार असून या पुढची लढाई इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने लढली जाऊ शकते.