महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचा साखर कारखानादाराशी भेदभाव – देवेन्द्र फडणवीस
दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे . त्याच्या अडचणी माहिती आहे अशा सगळ्या प्रमुख लोकं सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या .अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशा प्रकारची बैठक आज पार पडली . विशेषता यामध्ये एक आता सगळ्यांना अडचणीत असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्स नोटिसेस एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळ जवळ गेले पंधरा वीस वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखानादारांना त्रास होतो आणि आताही तशी नोटीस आलेले आहेत म्हणून याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे .यावर अतिशय सकारात्मक भूमिका अमितशहा यांनी घेतली आहे . साखर कारखाण्यावर कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे येत्या काळामध्ये घेऊ अशाप्रकारे त्यांनी आश्वासन दिले . गेल्या जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि त्याचा मोठा त्रास कारखाना होता त्यातला एक चांगला मार्ग निघणारे आहे . महाआघाडी सरकार सहकारी साखर कारखानदराशी भेदभाव करत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला . यावेळी हर्षवर्धन पाटील आणि दाणवे उपस्थित होते .