ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती दिवाळी नंतर करोना वाढण्याची शक्यता


मुंबई/ एकीकडे अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सर्व काही हळू हळू सुरू होत असतानाच दिवाळी नंतर कोरोना वाढण्याची शक्यता आहे अशी भीती खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे मात्र जमेची बाजू म्हणजे तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य मंत्र्यांनी फेटाळून लावली आहे हा एक दीलासाच म्हणावा लागेल
करोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झालंय नवे रुग्ण सापडण्याची आणि मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले आहे त्यामुळे निर्बंध हतबल जात आहेत आता हॉटेल्स आणि उपहारगृह रात्री १२वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे सर्व उद्योगधंदे आता सुरू झाले आहेत शाळा आणि मंदिरे उघडली तर २२तारखेपासून नाट्य आणि सिनेमागृह सुधा सुरू झालीत कारण जवळपास ७० टक्के लोकांनी करोना लसीचा एक डोस तर ३० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतलेत त्यामुळे आता लोक बिनधास्त लकल प्रवास करीत आहेत पण करोना अजून गेलेला नाही दिवाळीत बाजारांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची शकतात असल्याने दिवाळी नंतर करोना वाढण्याचा धोका आहे अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे मात्र तिसरी लाट येणार नाही त्यामुळे भीती नाही तरीही सावधानता बाळगण्याची गरज आहे असे टोपे यांनी सांगितले

error: Content is protected !!