ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

फराळाच्या सरकारी कीटला भ्रष्टाचाराच्या मुंग्या- गरिबांची दिवाळी रामभरोसे

मुंबई/ दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आलीय श्रीमंतांच्या घरात दिवाळीचा फराळ बनून तयार झालंय पण सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात ज्या चार वस्तूंचे पॅकेट देण्याची घोषणा केली होती .त्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे सरकारची ही दिवाळी भेट अजूनही गोरगरीब जनतेपर्यंत पोचलेली नाही परिणामी गरिबांची दिवाळी रामभरोसे आहे .
राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट आणि भाजप युती चे सरकार सत्तेवर आले या सरकारने यंदा गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी फराळासाठी लागणारे चार पदार्थांचे एक पॅकेट 100 रुपयांमध्ये रेशनवर देण्याचा निर्णय घेतला होता. पिवळ्या रेशनकार्ड धारक गरिबांसाठी हा निर्णय म्हणजे दिवाळीत देवाच्या प्रसाद सारखा होता पण दिवाळी काही दिवसांवर आली तरी या वस्तू अजून गरीबांना मिळालेल्या नाहीत त्यामुळे गरिबांच्या घरात अजूनही फराळ बनलेला नाही .
दरम्यान याबाबत आता अशी माहिती समोर आली आहे की जनतेला 100 रुपयात ज्या वस्तू दिल्या जाणार होत्या त्याच्या खरेदीच्या किमतीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे . सरकारने महाराष्ट्र कांझुमर फेडरेशन वर ही जबाबदारी सोपवली त्यांनी पुरवठा दार नेमले मात्र त्यांनी सरकारला चुना लावला .खुल्या बाजारात 240 रुपयांना मिळणारे हे चार पदार्थांच्या पॅकेट साठी त्यांनी 280 रुपये घेतल्याचे समजते शिवाय यातील काही पुरवठादार हे काळ्या यादीमध्ये टाकलेले आहेत आणि अशा लोकांना घाई घाईने आणि सवंग लोकप्रियतेसाठी या चार वस्तू पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते आणि त्यांनी या कंत्राटात आपल्या नेहमीच्या सवयप्रमाणे झोल केलाय मात्र त्यांचा हा झोल उघडकीस आल्यामुळे आता चौकशी होणार आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे . या झोल मुळेच सरकारने दिवाळीच्या फराळासाठी लागणारे चार पदार्थ अजूनही जनतेपर्यंत पोचवले नाहीत ते कधी मिळतील याची शाश्वती नाही त्यामुळे गरिबांची दिवाळी रामभरोसे आहे .

error: Content is protected !!