ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या ३५९ दिवसांच्या संघर्षांत समोर मोदी सरकार अखेर झुकले-मोदींचा माफीनामा-केंद्राची फजिती

दिल्ली/ सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ३५९ दिवसांपासून जे आंदोलन सुरू ठेवले होते त्यासमोर अखेर मोदी सरकार झुकले आणि काल सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेतले.शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आम्ही अपयशी ठरली त्यामुळे हे कायदे परत घेत आहोत आता आंदोलन शेतकऱ्यांनी आपापल्या आणि शेतात जावून काम करावे असे मोदींनी यावेळी सांगितले.तर संसदेत हे कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे किसान आंदोलनाचे नेते राकेश टीकेत यांनी सांगितले
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच संसदेत तीन कृषी कायदे मंजूर केले त्याविरुद्ध देशभर आंदोलन पेटले पंजाब आणि हर्यानाचा शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर येवून ठिय्या दिला त्यानंतर आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या पण तोडगा निघू शकला नाही उलट हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू होता त्यात आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात ७०० हून अधिक लोकांचा मृत्य झाला दरम्यान हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि या कायद्याच्या अंमलबजावणीला दीड वर्षाची स्थगिती देण्यात आली मात्र आंदोलन सुरूच होते अखेर पोटनिवडणुकीत भाजपला मोठे अपयशी येताच भाजप नेते अस्वस्थ झाले आणि येणाऱ्या पाच राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काल तिन्ही कायदे मागे घेतले मोदींच्या या निर्णयाचा देशभर मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला सर्वसामान्य माणसाची टाकत काय असते हे केंद्राला कळले असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी सांगितले

error: Content is protected !!