ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी दूर ठेवले त्याच काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी युती केली – राज ठाकरे
मुंबई- दुसऱ्याला गद्दार भरणारे उद्धव ठाकरे हेच मोठे गद्दार आहेत त्यांच्यामुळेच नारायण राणे मी स्वतः आणि शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले असा थेट आरोप मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केला आहे
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी शिवडी मतदार संघात प्रचार सभा घेतली होती या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले उद्धव ठाकरे यांची अवस्था एखाद्या खाष्ट सासूसारखी आहे. एका बाईला तीन मुलं असतात मोठ्या मुलाचे लग्न होतं परंतु त्याच्या बायकोचा सासू बरोबर पटत नाही म्हणून तो घरातून निघून जातो बायकोला घेऊन त्यानंतर दुसऱ्या मुलाचे लग्न होतं त्याच्याही बायकोचा सासू बरोबर पटत नाही तोही आपल्या बायकोला घेऊन जातो त्यामुळे मग लोक म्हणतात त्या फुलांमध्ये काही दोष नव्हता या सासूमध्येच काहीतरी दोष आहे म्हणूनच तिला सोडून त्या पोरं निघून गेली उद्धव ठाकरे हे असेच सासू सारखे आहे. म्हणून त्याला सगळे सोडून गेले महाराष्ट्रात राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहे मी मशिदी वरचे भोगे काढण्यासाठी आंदोलन केले होते त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते परंतु सुरुवातीला भोगे निघाले परंतु नंतर मात्र हे भोगे तसेच राहिले. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी दूर ठेवले त्याच काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी युती केली असा आरोप ही राज ठाकरे यांनी केला