एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट उलटून १३ प्रवाशांचा मृत्यू ! मृतांमध्ये नौदलाच्या ३ अधिकाऱ्यांचा समावेश
मुंबई – आज मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली . मुंबईवरून एलिफंटाकडे निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटाने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत बोटीतील १० आणि नौदलाच्या स्पीड बोटीतील ३ अशा १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती. मात्र, या बोटीला गेट ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली. या बोटेतून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले. यावेळी नौदलाने या बोटीमधील १०१ प्रवाशांना सुरक्षित वाचवलं. तर या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे. यामध्ये चार नौदलाचे हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट आणि एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं.७.३० पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी १०१ लोकांना सुरक्षित वाचवण्यात आलं आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी ७.३० पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ नौदलाचे जवान असून १० नागरिक आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.तसेच २ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला. दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता ८० असताना त्यातून ११० जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान या प्रकरणी १३ जणांचा मृत्यू आहे. त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.