ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या तर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महाविकास आघडीची सरर्शी


मुंबई/महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळे लढूनही महा विकास आघाडीची सरशी झाली असून भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला यश आले आहे महाविकस आघाडीने सर्वाधिक ६६ नगरपंचायत जिंकल्या तर भाजपच्या वाट्याला फक्त २२नगर पंचायती आल्या मात्र भाजपने सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादीने ३४४ काँग्रेसने ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या
नगर पंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर फूट बघायला मिळाली आणि अनेक ठिकाणी हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढले मात्र तरीही त्यांना विजयीलाला खास करून भाजपचा प्रभाव असलेल्या विदर्भात भाजपने १६१ जागा जिंकली तर काँग्रेसला १४० जागा मिळाल्या राष्ट्रवादीला ८८ तर सेनेला ७१ जागा मिळाल्या. कोकणातही राणेंच्या भरोषावर असलेली भाजप तोंडघशी पडली भाजपला ४९ तर शिवसेनेला ९५ जागा मिळाल्या राष्ट्रवादीने ६५ तर काँग्रेसला ३०मिळाल्या पश्चिम महाराष्ट्र हा तर काँग्रेस राष्ट्रवादीचा बले किल्ला तिथे राष्ट्रवादीने १०२ तर काँग्रेसने ४४जागा जिंकल्या भाजपला ६१ जागांवर समाधान मानावे लागले मराठवाड्यात भाजपने सर्वाधिक ८३ जागा जिंकल्या तर सेनेला ५३ आणि काँग्रेस राष्ट्रवादीला प्रत्येकी ६२ जागा मिळाल्या तर उत्तर महाराष्ट्रात खडसे आणि शिवसेना यांच्यातच सामना झाला तिथे भाजपला ३५ तर राष्ट्रवादीला ४६ जागा मिळाल्या मात्र प्रतिष्ठेची बोधवड नगर पंचायत खडसेंच्या हातून गेली कणकवली मतदार संघातील देवगड नगर पंचायत शिवसेनेने जिंकली तर कुडाळ मध्ये भाजपला सर्वाधिक ७जागा मिळालेल्या असल्या तरी दोन काँग्रेसने जिंकलेल्या असल्याने महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले

error: Content is protected !!