बाल हत्याकांडातील दोन बहिणीना फाशी ऐवजी जन्मठेप
मुंबई/संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ९ मुलांच्या हत्याकांडातील क्रूर आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी फाशी रद्द करून न्यायालयाने त्यांना जाठेपेची शिक्षा ठोठावली आहेे.
दरम्यान, महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीने विविध भागातून १३ बालकांचे अपहरण करून त्यापैकी ज्या मुलांनी पैसे कमावणं बंद केले त्या ९ मुलांची दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पुढे पैशांवरून वाद निर्माण झाल्याने रेणुका शिंदे हिचा नवरा त्यांच्यातून फुटला आणि त्यानं पोलिसांत जाऊन याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला माफिचा साक्षीदार बनवले होते. २००१ साली त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र २० वर्षांनंतरही या शिक्षेची अद्याप अमंलबजावणी न झाल्याने जगण्याची उमेद वाढल्याचा दावा ही फाशी रद्द करण्याची मागणी करत रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली या दोघींची आई अंजनाबाई गावित हिचा शिक्षा भोगत असतानाच जेलमध्येच मृत्यू झाला होता. गावित बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी २०१४ मध्ये फेटाळून लावली होती. या प्रकरणी आता या दोघी बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात दयेची याचिका केली आहे. जवळपास आठ वर्षांपासून या दोन्ही बहिणींच्या दयेचा अर्ज राष्ट्रपती कार्यालयात पडून होता. त्याचबरोबर या दोन बहिणींसारखी अन्य २० अशी प्रकरणं आहेत. ज्यात आरोपींच्या बाजून न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणांचा दाखला गावित बहिणींच्या वकीलांनी न्यायालयात दिला आहे.