ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

धनुष्यबाण कोणाचे निकाल 30 जानेवारीला

दिल्ली – धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे व ठाकरे गटांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला . दोघांनीही आपापली बाजू मांडली आता दोघांनाही त्यांचे लेखी म्हणणे मांडायला सांगण्यात आले असून या प्रकरणी पुढील सुनावणी ३० जानेवारीला असून त्याच दिवशी धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा निकाल लागणार आहे

शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी२३ जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज देखील मिळालं नाही. आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, २८२९७५ संघटनात्मक प्रतिनिधी,१९२१८१५ प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख २४ हजार ९५० पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, ४० आमदार,७११ संघटनात्मक प्रतिनिधी, २०४६ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि ४४८३१०प्राथमिक सदस्य अशा ४५१३२७ पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

error: Content is protected !!