एन आय ए मधील लष्कर ए तोयबाचा हस्तकला अटक
शिमला -भारताने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला गुप्त माहिती व कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास एजन्सीने माजी आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात ६ जणांना अटक झाली आहे.
लष्कर-ए-तोयबाचा भारतात घातपाती कारवाया घडवण्याचा कट होता. त्यात या संघटनेला नेगी यांनी मदत केल्याचा आरोप गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला झाला होता. २०११ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेल्या नेगीची चौकशी केल्यानंतर त्यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे उघडकीस आले. शिमला येथे अधीक्षक असलेल्या नेगीच्या घरावर एनआयएने छापा घालून झडती घेतली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनेला त्यांनी गुप्त कागदपत्रे दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांना अटक झाली.