लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेच्या वतीने अंतर्गत स्पर्धा संपन्न.
मुंबई- चिंचपोकळी येथील भाऊसाहेब गोलातकर मार्गावरील लक्ष्मी नारायण व्यायाम शाळा ट्रस्टच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे शनिवारी १९/२/२०२२ रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी होमहवन आधिक धार्मिक विधी झाले तसेच आयोजित केलेल्या बैठका, नमस्कार, डिप्स, पुलअप, स्कॉट स्पर्धा बक्षीस समारंभ पार पडला .पूजेच्या तीर्थप्रसाद घेण्यासाठी भविकानी मोठी गर्दी केली होती. विश्वस्त दत्तकुमार सावंत, विश्वस्त डॉक्टर विलास वडांबे, दत्तात्रय मांजरेकर हे निमंत्रक होते तर अध्यक्ष महादेव परब ,उपाध्यक्ष शशिकांत चिंदरकर, सचिव विजय गावडे, मानद सचिव बरदडे , खजिनदार तानाजी तुरांडे, संपादक किसनराव जाधव, वस्ताद तनवडे आदी संस्थेचे पदाधिकारी हजर होते.
अंतर्गत स्पर्धा विजेते-
नमस्कार- शुभम सपकाळ, आशू यादव, भावेश सातार्डेकर
बैठका- शुभम सपकाळ, प्रज्योत मानकर, अक्षय कामठे
डीप्स – शुभम सपकाळ, ओमकार कणसे, विजय मोरे
पुल अप-ओमकार कणसे, प्रथमेश खोत, जमीर खान
स्कॉट- मेहुल वाघ, शुभम सपकाळ, जमीर खान
बेंच प्रेस-जमीर खान, शरद कांबळे, विष्णू दाते.
स्ट्रॉंग मेन 2021-22- शुभम सपकाळ

