सांगली जिल्हा बँक शेतकर्यांसाठी की नेत्यांसाठी ?
gm§Jbr {Oëhm ~±H$
मुंबई/ राज्यातील वित्तीय संस्था या शेतकर्यांच्या हितासाठी असतात पण पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या काही सहकारी बँका आणि जिल्हा बँका पुढार्यांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत या बँकेमध्ये शेतकर्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर चक्क पुढारी डला मारीत असल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये आहे. सांगली जिल्हा बँकेने चक्क नेत्यांच्या कर्जाचे 110 कोटी व्याज माफ करण्याची तयारी चालवली आहे. नेत्यांनी त्यांच्या संस्थांनी कर्ज घ्यायची आणि बँका बुडवायचे असे प्रकार सुरू झालेले आहेत. या नेत्यांच्या कर्जानी व्याज माफीचा प्रस्ताव मान्य झाल्याने सांगली जिल्हा बँकेचे सी ई ओ जयवंत कडू पाटील यांनी राजीनामा दिला अशी चर्चा आहे तसेच बड्या नेत्यांच्या संस्थांचे 76 कोटी रुपये कर्ज राईट ऑफ करण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याची माहिती चर्चा आहे. बड्या कर्जदारांनी वन टाईम सेटलमेंट राईट ऑफ यावरून संचालक मंडलात वादंग आहे. ज्या कर्जदारांनी कर्ज बुडीत खात्यात जाण्याची शक्यता आहे त्यात जतचा दफळे कारखाना दीड कोटी ,कुपवडचा महाकंटेनर 2 कोटी 58 लाख,निनादेवी ऊस उत्पादक तोडणी वाहतूक संस्था 5 कोटी 95 लाख, प्रकाश ऍग्रो 4कोटी 98 लाख,,वसंत बाजार 1 कोटी 30 लाख,नेरला सोसायटी 1कोटी 34 लाख, यशवंत ऊस उत्पादक तोडणी वाहतूक संस्था 3 कोटी 33 लाख,महाराष्ट्र विद्युत उत्पादक 6 कोटी 75 लाख, शिवशक्ती ग्लुकोज लेंग्रे 91 लाख येवढे कर्ज बुडीत गेले तर बँकेचे काय होईल .जे पुढारी आणि त्यांच्या संस्था कर्ज आणि व्याज माफीत आहेत त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील,यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार विशाल पाटील, माजी आमदार राजेन्द्र देशमुख,सत्यजित देशमुख,आमदार सुमनताई पाटील यांच्या संस्थाचा समावेश आहे