ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिंदे गद्दार नाही तर खुद्दार आहे- उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

खेड -एकनाथ शिंदे हा गद्दार नसून खुद्दार आहे . गद्दारी २०१९ मध्ये झाली होती अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. काही दिवसांपूर्वी खेडच्या याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याच मैदानावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आधी मुख्यमंत्री होणार नाही असं सांगितलं. त्यानंतर पवार सांहेबांनी सांगितलं असं म्हणत मुख्यमंत्री झालात. तेही ठिक, पण त्यानंतर तुम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडली. बाळासाहेबांचा विचार बाजूला सोडला आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालात. सोनिया गांधी आणि कोकणातल्या लोकांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं, त्यांच्या विचाराला पाठिंबा दिला, तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय, त्यामुळे कोकण आपल्यासोबत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोकणातले सगळे शिलेदार आपल्यासोबत आहेत, त्यामुळे आम्हाला कुणाला उत्तर द्यायची गरज नाही असंही ते म्हणाले.
तुम्ही खोके, गद्दार म्हणून कितीही पाप केलं, बाळासाहेबांच्या विचारांना संकुचित केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात या मैदानात एक फुसका, आपटी बार येऊन गेला. मी काही त्याला उत्तर द्यायला आलेलो नाही. तोच तो थयथयाट, आदळाआपट… याला काय उत्तर देणार? तोच खेळ सुरू आहे, पण जागा बदलली आहे.
खोके आणि गद्दार हे दोनच शब्द आहेत. त्याशिवाय तिसरा शब्द नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात अर्थ नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
शिंदे म्हणाले की, “आजच्या सभेला झालेली गर्दी पाहून त्यांना प्रश्न पडला असेल. कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यांच्या मागे कोकणी माणूस आहे. आजही हा कोकणी माणूस त्यांच्या विचारांच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्हाला आता उत्तर देण्याची गरज नाही. कोकणी माणून वरून फणसासारखा, पण आतून हळवा असतो. तो एकदा शब्द दिला तर परत फिरत नाही.

error: Content is protected !!