राऊतानी आम्हाला शहाणपणा शिकवू नये – प्रकाश आंबेडकर भडकले मविआत तणातणी
अकोला : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडी सामील होण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. भाजपाबरोबर राहिलेत त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला आहे.
गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने माझ्याविरोधात मुस्लिम उमेदवार दिला. असं झाल्याने काँग्रेसचा जनाधार कमी झाल्याचं अकोल्यातील मुस्लिम समाजाचं मत, यावेळी असं झालं तर मुस्लिमांचे मत असेच राहील, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. चंद्रहार पाटलांवरून उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
मी पक्षाने सांगितलं तसेच निर्णय घेतो. पक्षाच्या आदेशाने काम करतो. माझ्या मताने झाले असते, तर कधीचाच निर्णय घेतला असता. युतीला विलंबाबत पक्ष आणि आंबेडकरांचं मत-मतांतरे आहेत का, असा प्रश्न निर्माण करणारे हे आंबेडकरांचं वक्तव्य आहे.
विकास आघाडी सोबतच्या युतीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं की, महाविकास आघाडीतील पक्षांत भांडणे आहेत, तेच भांडण मिटवत नाहीत. त्यांनी दिलेला तीन जागेचा प्रस्ताव आम्ही फेटाळून लावला आहे. भाजपला हरवण्यासाठी जी पाऊले उचलायला लागतील ती आम्ही उचलणार, असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.