पुण्यात टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग चार जणांचा होरपळून मृत्यू नऊ जण जखमी
पुणे/पुण्याच्या हिंजवडी भागातील फेज वन मध्ये एकाच टेम्पो ट्रॅव्हल ला भीषण आग लागून त्यातील चार कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहे हे सर्व कर्मचारी आयटी हब मधील व्योमा ग्राफिक या कंपनीचे होते
आज सकाळी आठ वाजता पुण्याच्या हिंजवडी भागातील पेज वन मध्ये व्योमा ग्राफिक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा एक टेम्पो ट्रॅव्हल ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे डिव्हायडर वर आदळला आणि अचानक इंजिनात शॉर्टसर्किट होऊन टेम्पोला आग लागली ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून खाली उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला तर इतर कर्मचाऱ्यांनी ही कशाबशा खिडकीतून बाहेर उड्या मारल्या परंतु मागच्या दरवाजा लॉक झाल्याने चार कर्मचारी आतचअडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाल्या या आगीत जखमी झालेल्या नव कर्मचाऱ्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार अर्थ दाखल करण्यात आली असून या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात मोठी खळबळ माजली आहे पुण्याच्या हिंजवडी भागातील आयटी हब मध्ये जवळपास पाच लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात आणि हे सर्व खाजगी वाहनाने प्रवास करतात यापूर्वीही या कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांना अपघात घडल्याच्या घटना घडल्या होत्या मात्र ही घटना सर्वात भीषण आहे
