ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नागपुरात 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम_ छावा पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा


मुंबई/ छावा चित्रपट पाहून लोकांच्या औरंगजेबाविरुद्धच्या भावना प्रज्वलित झाल्या मात्र काही लोकांनी तू नियोजित पणे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मात्र अशा लोकांना सरकार सोडणार नाही ते कोणत्याही जाती धर्माच्या असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात झालेल्या राड्याचे तीव्रप्रसाद विधानसभेत उमटले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना सांगितले की औरंगजेबाविरुद्धच्या लोकांच्या मनातील तीव्र भावना छावा चित्रपटात पाहून प्रज्वलित झाल्या आणि लोकांनी रस्त्यावर उतरून औरंगजेबावरचा राग प्रकट केला मात्र काही नाही हेतू पुरस्कार या शांततामय आंदोलनाला दंगलीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि महाल भागातील शांतता बिघडवली आतापर्यंत या प्रकरणी 50 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही सांगितले दरम्यान आज नागपूरच्या पोलीस आयुक्ताने रस्ता बागाची पाहणी करून कारवाईचे सक्त आदेश दिले तसेच काही भागात तपास करून दगडांचा तसेच शस्त्रांचा साठाही जप्त करण्यात आला आता याप्रकरणी काहींवर सीसीटीव्ही फुटेज पाहून अटकेची कारवाई केली जात आहे

error: Content is protected !!